जर तुम्ही साखर घालून चहा घेत असाल, तर चहा सोडल्याने दररोजच्या साखरेचे प्रमाण कमी होते, ज्यामुळे वजन घटू शकते.
जर तुम्ही दुधाचा चहा पित असाल, तर दुधातील फॅट आणि कॅलरी कमी झाल्यामुळे वजन कमी होऊ शकतं.
काही लोक चहा पिल्यामुळे भूक कमी होते, पण काहींना अॅसिडिटी आणि पचनाचे त्रास होतात. चहा सोडल्यावर पचन सुधारल्याने वजन कमी होऊ शकतं.
चहा पिण्याऐवजी जास्त पाणी प्यायला लागल्यास शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात आणि वजन कमी होण्यास मदत होते.
चहा घेताना बिस्किटे, फरसाण, टोस्ट असे पदार्थ घेतले जातात. हे टाळल्यास अतिरिक्त कॅलरी कमी होतात.