Marathi

मुलांमध्ये असतात ८ गुण, फक्त वडीलच मुलांसाठी करू शकतात 'हे' काम

Marathi

शॉर्टकट चालणार नाही

वडील मुलाला कष्ट आणि त्यागाचे महत्व पटवून देतात. मुलांना हे समजून सांगायला हवं की यशासाठी कोणताही शॉर्टकट नसतो. घरातल्या कामांपासून मैदानातील खेळापर्यंत सगळीकडे हा नियम लागू होतो. 

Image credits: freepik
Marathi

भीतीचा सामना करा

वडील आपल्या मुलाला भीतीचा सामना कसा करावा, ते शिकवत असतात. ते मुलाला कम्फर्ट झोनमधून बाहेर येऊन स्वतःच अस्तित्व तयार करायला शिकवत असतात. 

Image credits: freepik
Marathi

जबाबदारी घ्या

वडील मुलाला आपल्या कामाप्रती जबाबदारी आणि निर्णय घेण्याचं स्वतंत्र शिकवत असतात. एखाद्या चुकीमुळं जर नुकसान झालं असेल तर जबाबदारी घ्यायला वडीलच शिकवतात. 

Image credits: freepik
Marathi

स्पर्धा करा पण सन्मान ठेवायला शिका

वडील मुलांना खेळताना इमानदारी हा सर्वात महत्वाचा गुण शिकवत असतात. एखाद्या व्यक्तीशी स्पर्धा करणे ठीक आहे पण त्याचा सन्मान आणि ठेवायला शिकता यायला हवं. 

Image credits: fb
Marathi

बिघडलेल्या गोष्टी व्यवस्थित करायला शिकून घ्या

वडील मुलांना बिघडलेल्या वस्तू व्यवस्थित करायला शिकवत असतात. अडचणीच्या वेळेला मुलाला मदत होण्यासोबतच तो आत्मनिर्भर यामुळे बनत जातो. 

Image credits: fb
Marathi

अपयशाचा सामना सन्मानाने करा

वडील मुलांना कायमच अपयशाचा सामना सन्मानाने करायला शिकवत असतात. अपयशामुळे माणसाला पुढं जायला आणि शिकायला मिळत, असं वडील शिकवत असतात. 

Image credits: fb
Marathi

कुटुंबाचं रक्षण करणे

वडील मुलांना हे शिकवतात की स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी कुठं उभं राहायला हवं. इमानदारी आणि नात्यांचं महत्व वडील आपल्या मुलांना शिकवत असतात. 

Image credits: fb
Marathi

प्रत्येक व्यक्तीचा मान सन्मान ठेवणे

प्रत्येक व्यक्तीचा सन्मान ठेवायला हवा, हे वडील मुलाला शिकवत असतात. मुलांना हे गुण लहानपणापासून शिकवले जातात. 

Image Credits: fb