येत्या 1 नोव्हेंबरला दिवाळी साजरी केली जाणार आहे. याशिवाय लक्ष्मीपूजनही असल्याने पुढील काही चुका करणे टाळावे.
दिवाळीच्या पूजेवेळी काळ्या रंगातील वस्र परिधान करणे टाळा. काळा रंग नकारात्मकेचे प्रतीक मानला जातो. यामुळे कोणत्याही शुभ कार्यावेळी काळ्या रंगाचे कपडे परिधान करू नयेत.
दिवाळीला एखाद्याने जेवणाची इच्छा व्यक्त केल्यास त्याला जेवून पाठवा. अथवा एखाद्याने मदत मागितल्यास करा. अन्यथा देवी लक्ष्मी कधीच घरी प्रवेश करणार नाही.
दिवाळीवेळी देवी लक्ष्मीसोबत गणपती आणि देवी सरस्वतीचीही पूजा केली जाते. यामुळे घरात नॉन-व्हेज पदार्थ अथवा मद्यपानाचे सेवन करू नये.
दिवाळीच्या रात्री पती-पत्नीने ब्रम्हचार्याचे पालन करावे. अन्यथा नात्यात भविष्यात समस्या उद्भवू शकतात.
ज्या घरातील व्यक्ती एखाद्यावर शुभ दिवसावेळी राग व्यक्त करतात त्यांच्या घरात देवी लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही. याशिवाय कोणाचा दिवाळीवेळी अपमानही करू नका.
दिवाळी शुभ दिवसांचा सण आहे. यामुळे मनात कोणतेही वाईट विचार यावेळी आणू नका. यामुळे देवी लक्ष्मी नाराज होऊ शकते.