घरात झुरळ येण सामान्य बाब आहे. पण बाथरुम किंवा किचनच्या सिंकमधून झुरळ बाहेर पडत असल्यास अधिक समस्या होते. यामुळे आरोग्य बिघडले जाते.
झुरळांमुळे हाताला संक्रमण होऊ शकते. याशिवाय अन्नपदार्थांना झुरळांनी स्पर्श केल्यास विषबाधाही होऊ शकते. अशातच बाथरुममधील जाळीतून झुरळ येत असल्यास पुढील काही उपाय करू शकता.
बाथरुमच्या जाळीतून झुरळ येत असल्यास त्यावर गरम पाणी टाका. यामुळे बाथरुमची जाळी स्वच्छ होईल आणि झुरळही येणार नाहीत.
झुरळांच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी व्हिनेगरचा वापर करू शकता. यासाठी व्हिनेगर आणि पाण्याचे मिश्रण तयार करा. यानंतर बाथरुमच्या जाळीवर लिक्विड टाका.
बेकिंग सोड्याच्या मदतीने झुरळांपासून सुटका मिळू शकते. यासाठी बोकिंग सोडा बाथरुमच्या जाळीच्या आजूबाजूला टाकून ठेवा.
बोरिक अॅसिड बाथरुमच्या जाळीच्या आतमध्ये घाला. झुरळांनी बोरिक अॅसिडच्या पावडरला स्पर्श केल्यानंतर मरतात.
झुरळांना मारण्यासाठी बोरेक्स पावडर बेस्ट पर्याय आहे. यासाठी बोरेक्स पावडरमध्ये साखर मिक्स करुन झुरळ ज्या ठिकाणाहून येतात तेथे स्प्रे करा.