देवउठणी एकादशी वेळी भगवान विष्णू योग निद्रेतून जागे होतात. याच दिवसापासून शुभ कार्यांना सुरूवात होते. याशिवाय देवी लक्ष्मी व भगवान विष्णू यांची देखील पूजा केली जाते.
येत्या 11 नोव्हेंबरला 6.46 मिनिटांनी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाची तिथी सुरु होणार असून 12 नोव्हेंबरला दुपारी 04.14 वाजता संपणार आहे.
उदयातिथीनुसार, देवउठणी एकादशी येत्या 12 नोव्हेंबरला साजरी केली जाणार असून 13 नोव्हेंबरला एकादशीच्या व्रताचे पारायण केले जाणार आहे.
धार्मिक ग्रंथांनुसार, एकादशीचे व्रत केल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळतो. याशिवाय, व्यक्तीला मोक्ष मिळण्यासह धनात वाढ होते. या दिवशी देवी लक्ष्मीचीही पूजा केली जाते.
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.