उन्हाळ्याच्या दिवसात काकडीचे सेवन करणे फायदेशीर मानले जाते. यामधील पोषण तत्वे आरोग्य हेल्दी ठेवण्यास मदत करतात. याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया.
काकडीचे सॅलड खाणे बहुतांशजणांना पसंत असते. याशिवाय काहीजण डिटॉक्स वॉटरही पितात. डाएटमध्ये काकडीचा कोणत्या प्रकारे समावेश करावा याबद्दल जाणून घेऊ.
काकडीचा ज्यूस तयार करण्यासाठी सर्वप्रथम काकडी स्वच्छ धुवून लहान आकारात कापून घ्या. यानंतर मिक्सरमध्ये काकडी वाटून घ्या. मिक्सरच्या भांड्यातून काकडीचा ज्यूस काढून प्या.
काकडी आणि दह्याचे सॅलड काहीजण खातात. यासाठी सर्वप्रथम काकडी स्वच्छ धुवून लहान आकारामध्ये कापून घ्या. एका भांड्यामध्ये चिरलेली काकडी, दही आणि मीठ घालून मिक्स करा.
उन्हाळ्यात काकडीचा रायता खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यासाठी काकडी बारीक चिरुन घ्या. यानंतर दही, कांदा, टोमॅटो आणि मीठ घालून रायता तयार करा.