पावसाळ्यात हिरव्या भाज्या लवकर खराब होतात. तर पावसाळ्यात कोथिंबीर दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी काय करावे याबद्दलच्या काही खास टिप्स जाणून घेऊया...
पावसाळ्यात कोथिंबीर लवकर खराब होण्यापासून दूर ठेवण्यासाठी निवडून प्लास्टिक बॅगमध्ये भरुन ठेवा.
कोथिंबीरची पाने ओलसर अथवा दमट असल्यास पंख्याखाली सुकवा.
कोथिंबीर पावसाळ्यात दीर्घकाळ टिकवण्यासाठी टिश्यू पेपरमध्ये बांधून पॉलिथिन बॅगमध्ये भरून ठेवा.
वृत्तपत्रात गुंडाळून कोथिंबीर घट्ट झाकणाच्या डब्यात ठेवल्यानेही टिकून राहते.
घट्ट झाकणाच्या डब्यात कोथिंबीर ठेवताना त्यामधील ओलसरपणा पू्र्णपणे काढून घ्या. अन्यथा कोथिंबीर पावसाळ्यात लवकर खराब होईल.