Lifestyle

FASHION

Broad shouldersसाठी ब्लाऊजच्या या डिझाइन देतील परफेक्ट लुक

Image credits: instagram

बस्टिअर ब्लाऊज

खांदे रुंद असल्यास तुम्ही स्लिव्हलेस बस्टिअर ब्लाऊजचा पर्याय निवडू शकता. रुंद खांदे असणाऱ्या तरूणींना बस्टिअर ब्लाऊज सुंदर दिसते. हे ब्लाऊज तुम्ही जॅकेटसोबतही स्टाइल करू शकता.

Image credits: instagram

ऑफ शोल्डर ब्लाऊज

तुमचे खांदे रुंद असल्यास ऑफ शोल्डर ब्लाऊज ट्राय करू शकता. या डिझाइनचे ब्लाऊज साडी अथवा लेहंग्यावरही छान दिसते. या ब्लाऊजवर चोकर ज्वेलरी सुंदर दिसते.

Image credits: instagram

हॉल्टर नेक ब्लाऊज

पूजा हेगडने परिधान केलेल्या हॉल्टर नेक ब्लाऊजची निवड केल्यास तुम्हालाही बोल्ड व स्टायलिश लुक मिळेल.

Image credits: instagram

फ्रिल वर्क

फ्रिल वर्क डिझाइनमधील ब्लाऊज मेंदी सोहळ्यासाठी बेस्ट पर्याय आहे. फ्रिल वर्कमध्ये गडद रंगाचे ब्लाऊज साडी अथवा लेहंग्यावर छान उठून दिसते. ब्लाऊजसह परफेक्ट लुकसाठी हलका मेकअप करा.

Image credits: instagram

स्लीव्हलेस ब्लाऊज

भूमी पेडणेकरसारखा डीप नेक डिझाइन असणारे स्लिव्हलेस ब्लाऊज एखाद्या फंक्शनवेळी परिधान करू शकता. स्लिव्हलेस ब्लाऊजचे वेगवेगळे पॅटर्न आणि डिझाइन्स तुम्हाला मार्केटमध्ये पाहायला मिळतील.

Image credits: instagram

लाइट सिक्विन डिझाइन ब्लाऊज

एखाद्या नाइट पार्टीसाठी साडी नेसणार असल्यास दीपिका पादुकोणसारख्या लाइट सिक्विन डिझाइनच्या ब्लाऊजची निवड करू शकता. अशा प्रकारचे ब्लाऊज पार्टीसाठी सुंदर आणि आकर्षक दिसतात. 

Image credits: instagram

पर्ल वर्क ब्लाऊज

पर्लचे हेव्ही वर्क असणारे आणि भरलेली डिझाइन असणारे ब्लाऊज तुम्ही एखाद्या पार्टी-फंक्शनवेळी परिधान करू शकता. अशा प्रकारच्या पर्ल वर्कच्या ब्लाऊजवर मोठे झुमके सुंदर दिसतात.

Image credits: instagram