जेवल्यानंतर लगेच या गोष्टींपासून राहा दूर, अन्यथा...
आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात आरोग्याची काळजी घेणे फार कठीण झाले आहे. वजन वाढणे ते खाण्यापिण्याच्या बदललेल्या सवयीमुळे आरोग्य बिघडले जाते.
काही वेळेस आपण खाल्ल्यानंतर अशा काही चुका करतो त्याचा परिणाम थेट आरोग्यावर होऊ शकतो. याबद्दलच जाणून घेऊया सविस्तर...
जेवल्यानंतर लगेच आंघोळ केल्याने याचा परिणाम थेट पचनक्रियेवर होते. यामुळे अपचनाची समस्या निर्माण होऊ शकते. अशातच जेवणापूर्वी आंघोळ करावी.
जेवणानंतर लगेच थंड पाणी पिणे टाळावे. यामुळे पचनक्रियेत अडथळा निर्माण होऊ शकतो. जेवणानंतर तासाभराने पाणी प्यावे असा सल्ला तज्ज्ञ देतात.
जेवणानंतर लगेच फळं खाल्ल्याने बद्धकोष्ठता आणि गॅसची समस्या होऊ शकते. याशिवाय शरीरात टॉक्सिन्स पदार्थ जमा होऊ शकतात. यामुळे काही प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
जेवल्यानंतर लगेच झोपणे आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकते. या सवयीमुळे छातीत जळजळ होण्याची समस्या निर्माण होऊ शकते. झोपण्यापूर्वी कमीत कमी दोन ते तीन तास आधी जेवावे.
जेवल्यानंतर लगेच हेव्ही व्यायाम करणे टाळावे. याचा परिणाम तुमच्या पचनक्रियेवर होऊ शकतो. तसेच जेवल्यानंतर व्यायाम केल्याने उलटी आणि पोटदुखीची समस्याही निर्माण होऊ शकते.
जेवणानंतर चहा, कॉफीसारख्या कॅफेनयुक्त पदार्थांचे सेवन करणे टाळावे. जेवणानंतर कॅफेनचे सेवन केल्याने शरीर आहारातील लोह व्यवस्थितीत शोषून घेऊ शकत नाही.
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.