हिवाळ्यात बनवा मटारच्या या सोप्या, स्वादिष्ट रेसिपी
मटार मसाला करी ही अत्यंत सोपी रेसिपी आहे. यामध्ये वेगवेगळ्या मसाल्यांचा वापर केला जातो. मटार मसाला करी तुम्ही भात किंवा पोळीसोबत खाऊ शकता.
मटार, पालक आणि उकडलेल्या बटाट्यापासून वेगवेगळ्या रेसिपी तयार करता येतात. हिवाळ्यात तुम्ही झटपट तयार होणारी हरा भरा कबाबची रेसिपी नक्की ट्राय करू शकता.
मटार पनीर उत्तर भारतीय डिश असून यामध्ये टोमॅटोच्या ग्रेव्हीचा वापर केला जाते. याशिवाय मटार पनीरमध्ये जीरे, धणे आणि गरम मसालाही वापरला जातो.
मटार पराठा तुम्ही नाश्तासाठी खाऊ शकता. याशिवाय मटार पराठासोबत तुम्ही दही, लोणचे अथवा चटणी सर्व्ह करू शकता.
मटारची उसळ ही एक महाराष्ट्रीयन लोकांची आवडीची डिश आहे. या रेसिपीमध्ये मोड आलेले मटार, नारळ आणि गोडा मसाला वापरला जातो.
मेथी मटार मलाई रेसिपीसाठी मलाईमध्ये मेथी मिक्स करून तयार केली जाते. ही डिश गोडसर आणि तुरट असून उत्तर भारतीय आवडीने खातात.
मटार आणि बटाट्यापासून तयार होणारी रेसिपी म्हणजे आलू मटार. आलू मटारसाठी टोमॅटोची ग्रेव्ही वापरून तयार केली जाते. ही रेसिपी तयार केल्यानंतर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली जाते.
पुलाव आणि बिर्याणीमध्ये मटारचा वापर हमखास केला जातो. मटारमुळे भाताला एक वेगळी चव येते.
सकाळच्या नाश्तामध्ये चटपटीत काहीतरी खायचे असल्यास मटर कचोरी नक्की ट्राय करू शकता. या रेसिपीसाठी उडकलेले मटर आणि मैद्याच्या पीठाचा वापर केला जातो.