हैव्ही अॅम्ब्रॉयडरी वर्क असणाऱ्या ब्लाऊजला पफ डिझाइन देण्यात आली आहे. साडी किंवा लेहेंग्यावर अशाप्रकारचे ब्लाऊज सुंदर दिसेल.
लग्नसोहळ्यातील एखाद्या फंक्शनवेळी खुशी कपूरसारखा हेव्ही सिक्विन वर्क असणारे नेट ब्लाऊज ट्राय करू शकता. यावर मोत्याची किंवा डायमंडची ज्वेलरी शोभून दिसेल.
लग्नसोहळ्यात चारचौघांमध्ये उठून दिसायचे असल्यास अॅम्ब्रॉयडरी नेट ब्लाऊज शिवून घेऊ शकता. यामध्ये वेगवेगळ्या डिझाइन्सही ऑनलाइन आणि मार्केटमध्ये पहायला मिळतील.
चिकनकारी वर्कच्या कापडाचे हार्ट नेकलाइन असणारे ब्लाऊज एखाद्या लेहेंग्यावर किंवा साडीवर सुंदर दिसेल. ब्लाऊजला पफ स्लिव्हजसह नेटही लावण्यात आली आहे.
गोल्डन टिश्यू सिल्क साडीसोबत सोनम कपूरने नेट अॅम्ब्रॉयडरी असणारे ब्लाऊज घातले आहे. साडीवरील लूक पूर्ण करण्यासाठी सोनमने मोठ्या झुमक्यांची निवड केली आहे.
सध्या बोटनेक ब्लाऊजचा ट्रेन्ड आहे. नेटमध्ये चिकनकारी वर्क कापडाचे करिनासारखे ब्लाऊज शिवून घेऊ शकता.
आलिया भट्टने फ्लोरल डिझाइन असणाऱ्या साडीवर रफल नेट अॅम्ब्रॉयडरी ब्लाऊज घातले आहे. पार्टी-फंक्शनवेळी अशाप्रकारचे ब्लाऊज सुंदर दिसेल.