या देशांमध्ये जानेवारी महिन्यात साजरा केला जातो ख्रिसमस
संपूर्ण जगात ख्रिसमस 25 डिसेंबरला साजरा केला जातो. पण काही देशांमध्ये हा सण जानेवारी महिन्यात साजरा केला जातो. खरंतर यामागे एक खास कारण देखील आहे. जाणून घेऊया याबद्दल सविस्तर.....
जानेवारीत ख्रिसमस साजरा करणाऱ्या देशांमध्ये युक्रेन, माल्डोवा, जॉर्जिया, ग्रीस, रोमानिया, बेलारूस अशा एकूण 15 देशांचा समावेश आहेत.
हे 15 देश दरवर्षी 7 जानेवारीला ख्रिसमस सण साजरा करतात. यामध्ये रशियासह मध्य-पूर्वेतील काही देशांचा समावेश आहे.
7 जानेवारीला ख्रिसमस साजरा करण्यामागील कारण म्हणजे दिनदर्शिका. खरंतर ज्युलियन कॅलेंडर आणि ग्रेगोरियन कॅलेंडरमध्ये तारखांचा फरक आहे.
ग्रेग्रोरियन कॅलेंडर वर्ष 1582 मध्ये पोप ग्रेगोरी यांनी सुरू केले होते. ज्युलियन कॅलेंडर 46 इ.स.पू मध्ये ज्युलियस सीजर यांनी सुरू केले होते. या कॅलेंडरमध्ये 13 दिवसांचा फरक आहे.
जगभरात ख्रिसमस सणाची धूम दिसून येते. यावेळेस ख्रिसमस ट्री सजवणे आणि एकमेकांना भेटवस्तू देऊ सण साजरा केला जातो. ख्रिसमसचा सण मोठ्या आनंदात साजरा केला जातो.
ख्रिसमस सणासाठी बहुतांश ठिकाणी केक तयार केला जातो. पण स्लोवाकियामध्ये हलवा तयार केला जातो. या खास हलव्यास 'लोक्सा' असे म्हटले जाते.
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.