Author: Chanda Mandavkar Image Credits:social media
Marathi
साहित्य
टोमॅटो केचप, पिझ्झा सॉस, शेजवान चटणी किंवा सॉस, ओरेगनो, 1 टीस्पून मिरी पावडर, मिक्स हर्ब्ज,मीठ चवीनुसार, बटर ,शिमला मिरची, चिरलेला कांदा,बेबी कॉर्न, पनीर, चीझ आणि तयार पिझ्झा बेस.
Image credits: social media
Marathi
कृती
सर्वप्रथम शिमला मिरची कांदा बेबी कॉर्न पिझ्झा साठी लागतात त्याप्रमाने चिरून घ्या.
Image credits: Social media
Marathi
पिझ्झा बेसचा वापर
गॅसवर तवा गरम करण्यास ठेवा. दुसऱ्या बाजूला पिझ्झा बेस व टॉपिंग तयार करून घ्या. त्यासाठी एका पिझ्झा बेसवर थोडे बटर, टोमॅटो केचप घाला.मग त्यावर पिझ्झा सॉस,शेजवान सॉस/चटणी लावा.
Image credits: social media
Marathi
पिझ्झा बेसवर सामग्री घाला
पिझ्झा बेसवर सॉस नीट पसरून त्यावर आपल्या आवडीचे भाज्या टॉपिंगसाठी वापरा. यावर मीठ, ओरेगेनो आणि मिक्स हर्ब्स पिझ्झावर स्प्रिंकल करा.
Image credits: social media
Marathi
तव्यावर पिझ्झा ठेवा
पिझ्झावर चीझ किसून बेस तव्यावर ठेवा. गरम तव्यावर 5 मिनिटांसाठी झाकण लावून ठेवा.
Image credits: social media
Marathi
खाण्यासाठी सर्व्ह करा
5 मिनिटानंतर तव्यावरील झाकण काढून पिझ्झा एका प्लेटमध्ये काढत खाण्यासाठी सर्व्ह करा.