चाणक्य म्हणतात, अपमान झाला की लगेच रागाने काहीही करणं योग्य नाही. संयम ठेवा, शांत राहा, आणि योग्य वेळेची वाट पाहा.
अपमानाचा सर्वोत्तम बदला म्हणजे स्वतःच्या कर्तृत्वाने जगात अशी जागा मिळवणं की जिथं त्या व्यक्तीला तुमचं मानणं भाग पडेल.
चाणक्य म्हणतात की बदला घेण्यासाठी भावनेपेक्षा बुद्धी वापरा. कोणतीही कृती करण्याआधी त्याची कमजोरी ओळखा.
बदल घ्यायचा असेल, तर योग्य वेळेची प्रतीक्षा करा. चुकीच्या वेळी उचललेलं पाऊल तुम्हालाच हानी करू शकतं.
"माणसाच्या शौर्याची खरी ओळख अपमान झेलून, योग्य वेळी आपला सन्मान परत मिळवण्यात आहे."