चाणक्य यांनी यश प्राप्तीसाठी व्यक्तीने कोणते काम करावे हे सांगितले आहे. तसेच त्यांनी कोणत्या गोष्टींपासून दूर राहावे हे सांगितले आहे. ते म्हणतात की कोणाला खरं भ्याड मानावं.
चाणक्य म्हणतात की, आयुष्यात संघर्ष येत असल्यास घाबरू नये. संघर्षच व्यक्तीला आतून मजबूत करतात. त्यामुळे, जो व्यक्ती अडचणींमुळे घाबरतो, तो प्रगती करू शकत नाही.
चाणक्य म्हणतात, जे लोक जीवनात येणाऱ्या बदलांमुळे घाबरतात, ते कधीही आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाहीत. बदलांपासून घाबरणारे लोक नेहमीच चिंतेत राहतात.
मेहनतीला घाबरणाऱ्या व्यक्तीला आयुष्यात काहीच मिळत नाही. त्यामुळे मेहनतीपासून कधीही पाठ फिरवू नका. चांगले कर्म करत राहा आणि आपल्या मार्गावर पुढे जात राहा.
या लेखात दिलेली माहिती पूर्णतः सत्य आणि अचूक असल्याचा आम्ही दावा करत नाही. ही माहिती स्वीकारण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या