अदिती राव हैदरी यांची आवडती हैदराबादी अंडा खगीना ही अंडी आणि मसाल्यांचा वापर करून तयार केलेली स्वादिष्ट आणि झटपट पाककृती आहे.
कढईत तेल गरम करून कांदा हलका सोनेरी होईपर्यंत परतून घ्या. यानंतर त्यात टोमॅटो, हिरवी मिरची, हळद, तिखट घालून मिक्स करा.
मसाले शिजल्यानंतर अंडी फोडून मसाल्यामध्ये घाला आणि ढवळत असताना चांगले मिसळा. अंडी पूर्णपणे सेट होईपर्यंत शिजवा.
शेवटी चिरलेली कोथिंबीर आणि गरम मसाला घाला. हलकेच मिक्स करून गॅस बंद करून वाफ येऊ द्या.
हैद्राबादी अंडी खगीना गरम पराठा, नान किंवा ब्रेडसोबत सर्व्ह करा. हे स्नॅक किंवा हलके जेवण म्हणून स्वादिष्ट आणि प्रथिनांनी समृद्ध आहे.