मृत्यूनंतर व्यक्ती सोबत काय घेऊन जातो असा प्रश्न प्रत्येकालाच पडतो. पण शास्रानुसार, मृत्यूनंतर व्यक्ती पुढील काही तीन गोष्टीसोबत घेऊन जातो.
गीतेत म्हटले आहे की, मनुष्य कर्माशिवाय एक क्षणही जीवंत राहू शकत नाही. ज्यावेळी मृत्यूची वेळ येते तेव्हा आत्माद्वारे केलेल्या सर्व कर्मांबद्दलच्या आठवणी समोर येतात.
एखाद्या व्यक्तीने आयुष्यात सकारात्मक किंवा चांगले कर्म केल्यास स्वर्ग लाभतो. पण वाईट कर्मांचे फळ पुढील जन्मातही वाईटच मिळते.
गरुड पुराणानुसार, एखा व्यक्तीने घेलेले कोणतेही कर्ज न फेडल्यास त्याला पुढील जन्मात फेडावेच लागते. यामुळे आयुष्यात पैशांसंबंधित जबाबदाऱ्या पूर्णपणे पार पाडाव्यात.
दान, दया आणि परोपकाराचे गुण काही जन्म आपल्यासोबत राहतात. तुम्ही केलेले पुण्य ठरवते की, तुम्हाला स्वर्ग लाभणार आहे की नरक.
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.