अभिनेत्री भाग्यश्री बांधणी प्रिंट असणाऱ्या सिल्क साडीमध्ये फार सुंदर दिसतेय. अशाप्रकारची साडी एखाद्या फंक्शनवेळी नेसू शकता. यावर मोत्याची ज्वेलरी ट्राय करा.
चारचौघांत वयाच्या पंन्नाशीतही एखाद्या पार्टी फंक्शनवेळी उठून दिसायचे असल्यास भाग्यश्रीसारखी सिक्वीन वर्क नेट साडी ट्राय करा. अभिनेत्रीने मिनिमल मेकअप आणि ज्वेलरीने लूक पूर्ण केलाय.
ट्रेडिशनल लूकसाठी भाग्यश्रीसारखी जांभळ्या रंगातील बनारसी सिल्क साडी नेसू शकता. यावर कॉन्ट्रास्ट रंगातील ब्लाऊज शोभून दिसेल.
वयाच्या पंन्नाशीत एलिगेंट लूकसाठी पटोला साडी नक्की खरेदी करू शकता. यावर मोत्यांची ज्वेलरी शोभून दिसेल. खरंतर, अशाप्रकारच्या साड्यांमुळे रॉयल लूक येतो.
घरातील एखाद्या फंक्शन किंवा पूजेवेळी भाग्यश्रीसारखी ठसर सिल्क साडी नेसू शकता. पांढऱ्या आणि लाल रंगातील कॉन्ट्रास्ट साडीमध्ये तुमचा लूक अधिक खुललेला दिसेल.
सिंपल आणि सोबर लूकमध्येही हटके दिसायचे असल्यास भाग्यश्रीसारखी फ्लोरल डिझाइन शिफॉन साडी खरेदी करू शकता. यावर पांढऱ्या किंवा पिंक रंगातील ब्लाऊज ट्राय करा.