लिव्हिंग रुमची सजावट करण्यासाठी गडद रंगांतील वस्तूंचा वापर करू शकता. याशिवाय होम डेकोरसाठी येणारी आर्टिफिशियल झाडं देखील घराच्या कोपऱ्यात ठेवू शकता.
बेडरुममध्ये मेकअप टेबलवर असा आरसा असल्यास त्याच्य बाजूने एलइडी लाइटने सजावट करा. याशिवाय आरशाच्या बाजूने पेटिंग्स किंवा फोटो फ्रेमही लावू शकता.
तुमच्या आठवणी कायम तुमच्या समोर राहण्यासाठी फोटोंनी घरातील एखादी भिंत सजवू शकता. याशिवाय अस्थेटिक लूकसाठी ब्लॅक अँड व्हाइट फोटो फ्रेमचीही निवड करू शकता.
घराचा कोपरा अशाप्रकारे सजवू शकता. एका बाजूला लॅम्प आणि त्याच्या बाजूला एखादे शोपीस ठेवू शकता. याशिवाय खिडकीच्या विंडोला गोल्डन लाइटने सजवू शकता.
तुम्हाला क्राफ्टची आवड असल्यास अशाप्रकारचे एखादे क्राफ्ट तयार करुन भिंत सजवू शकता. यासाठी रंगीत पेपरचा वापर करा.