महिलांची सुरक्षितता देशात आज मोठा मुद्दा झाला आहे. भीतीच्या कारणास्तव काही महिला घराबाहेर पडत नाही. अशातच बाजारात गर्दीमध्ये स्वत:ची सुरक्षितता राखण्यासाठी खास टिप्स पाहूया.
गर्दीच्या ठिकाणी एखादा व्यक्ती मुद्दाम धक्के देत चालण्याचा प्रयत्न करू शकतो. अशातच मार्केटमध्ये एका बाजूने चाला.
बाजारात सामान खरेदी करताना ऑनलाइन पेमेंट करण्याचा प्रयत्न करा. काहीवेळेस गर्दीत तुमचे पाकिट मारले जाऊ शकते.
मार्केटला जाण्याआधी फोन पूर्ण चार्ज करा. यामुळे एखादी घटना घडल्यास मदतीसाठी जवळच्या व्यक्तीला फोन करुन बोलावता येईल.
मार्केटमध्ये एखाद्या अज्ञात व्यक्तीने बोलण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्यापासून दूर जा.
कधीही घराबाहेर पडताना बॅगमध्ये सेफ्टी टूल्स असावे. जेणेकरुन आपत्कालीन स्थितीत स्वत:ची सुरक्षितता राखता येईल.
बाजारात गर्दीच्या ठिकाणी छेडछाड झाल्यास जोरात ओरडून आजूबाजूच्या नागरिकांना मदतीसाठी बोलवा.
गर्दीत एखादा व्यक्ती सातत्याने पाठलाग करत असल्यास एखाद्या दुकानात अथवा मॉलमध्ये जा. येथून मदतीला सोबत कोणालातरी घेऊन बाहेर पडा.