Lifestyle

जेवणात दररोज वरण खाऊन कंटाळात? ट्राय करा आमटीचे हे 7 प्रकार

Image credits: Social Media

आमसुलाचे सार

जेवणामध्ये नॉन-व्हेजच्या दिवशी आमसुलाचे सार करू शकता. यासाठी आमसुल, सुक खोबरे, धणे-जिरे पावडर वापरुन आमसुलाचे सार करता येते.

Image credits: Social Media

कटाची आमटी

कटाची आमटी महाराष्ट्रीय लोकांना पुरणपोळीसोबत खाणे फार आवडते. पण भातासोबतही कटाची आमटी छान लागते. या रेसिपीसाठी हरभाराची डाळ, लवंग, लाल तिखट मसाला वापरला जातो. 

Image credits: Social Media

टोमॅटोचे सार

टोमॅटोचे सार माशांचा बेत असतो तेव्हा करू शकता. यासाठी टोमॅटो, कढीपत्ता, सुकं खोबऱ्याचा वापर केला जातो. भातासोबत टोमॅटोचे सार फार सुंदर लागते. 

Image credits: Social Media

मसूराची आमटी

अख्ख्या मसूराची आमटी देखील भातासोबत छान लागते. झटपट होणाऱ्या मसूराच्या आमटीसाठी मसूर, कढीपत्ता, लाल तिखट, कोथिंबरचा वापर केला जातो. 

Image credits: Social Media

मटकीचे सार

पातळ रस्सा भाजी अथवा भातावर सार म्हणून मटकीचे सार ट्राय करु शकता. यासाठी वाफवलेली मटकी, लाल तिखट, कढीपत्ता, खोबऱ्याचा वापर केला जातो. 

Image credits: Social Media

सोलकढी

कोकणातील आणि नॉन-व्हेजच्या जेवणासोबत आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे सोलकढी. बहुतांशजण सोलकढी भातासोबत खातात. यासाठी नारळाचे दूध, कोकम आगळ, कोथिंबरीचा वापर केला जातो. 

Image credits: Social Media

कढी

आंबट ताकापासून वेगवेगळ्या प्रकारची कढी तयार करता येते. बहुतांशजणांना कढी-पकोडो, तडका कढी असे प्रकार आवडतात. 

Image credits: Social Media