यकृत आपल्या शरीरातील एक महत्वपूर्ण अवयव आहे. याच्या मदतीने शरीरातून विषाक्त पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि रक्त शुद्ध होते.
Image credits: Freepik
Marathi
लिंबू पाणी
लिंबामध्ये व्हिटॅमिन सी, अँटी-ऑक्सिडेंट्स असतात. यामुळे यकृत डिटॉक्स होण्यास मदत होते. यासाठी दररोज सकाळी कोमट पाण्यात लिंबाचा रस मिक्स करुन प्या.
Image credits: freepik
Marathi
ग्रीन टी
ग्रीन टीमध्ये अँटी-ऑक्सिडेंट्स असतात. यामुळे शरीरातील विषाक्त पदार्थ बाहेर पडतात. यकृताच्या आरोग्यासाठी याचे सेवन करू शकता.
Image credits: freepik
Marathi
आलं आणि मध
आलं यकृताच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. तर मधामध्ये नैसर्गिक रुपात अँटीबॅक्टेरियल गुण असतात. यामुळे यकृत डिटॉक्स होण्यास मदत होते.
Image credits: Getty
Marathi
हळद
हळदीमध्ये कर्क्यूमिन नावाचे तत्त्व असते. जे यकृत डिटॉक्स होण्यास मदत होऊ शकते. दूधामध्ये हळद मिक्स करुन पिऊ शकता.
Image credits: social media
Marathi
आवळा
आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, अँटी-ऑक्सिडेंट्स आणि फायबर्स असतात. जे यकृताच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. यासाठी आवळ्याचे सेवन करू शकता.
Image credits: Pinterest
Marathi
मुळा
मुळ्यामध्ये काही पोषण तत्त्वे असतात, यामुळे यकृत डिटॉक्स होण्यास मदत होते. मुळ्याचा ज्यूस किंवा सॅलड खाऊ शकता.
Image credits: unsplash
Marathi
Disclaimer
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.