Marathi

अक्रोड खाण्याचे आरोग्यदायी फायदे

रोज मूठभर अक्रोड खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. ६ महत्त्वाचे फायदे.

Marathi

'खराब' कोलेस्ट्रॉल कमी करतं

अक्रोडमध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिड असलेलं अल्फा-लिनोलेनिक ऍसिड (ALA) भरपूर प्रमाणात असतं. यामुळे LDL म्हणजेच 'खराब' कोलेस्ट्रॉल कमी व्हायला मदत होते.

Image credits: Getty
Marathi

मेंदूच्या पेशींचं संरक्षण करतं

अक्रोडमध्ये अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन ई आणि पॉलिफेनॉलचं प्रमाण जास्त असतं. हे घटक मेंदूच्या पेशींचं संरक्षण करतात आणि आकलनशक्ती (Cognitive Function) चांगली ठेवण्यास मदत करतात.

Image credits: Sociall media
Marathi

पचनक्रिया सुधारते

रोज अक्रोड खाल्ल्याने आतड्यातील चांगल्या बॅक्टेरियाला पोषण मिळतं. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि एकूणच रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

Image credits: Sociall media
Marathi

अवेळी लागणारी भूक रोखतं

अक्रोडमध्ये हेल्दी फॅट्स, प्रोटीन आणि फायबरचं चांगलं मिश्रण असतं. यामुळे पोट बराच वेळ भरलेलं राहतं आणि अवेळी भूक लागत नाही.

Image credits: Sociall media
Marathi

ब्लड शुगर नियंत्रणात ठेवतं

नियमितपणे अक्रोड खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. यामुळे टाइप 2 मधुमेहाचा धोका कमी होण्यासही मदत होते.

Image credits: Sociall media
Marathi

केसांना पोषण देतं

अक्रोडमधील ओमेगा-३ फॅटी ऍसिड आणि बायोटिन केसांच्या मुळांना मजबूत करतात. यामुळे केसगळती कमी होते आणि केसांना नैसर्गिक चमक येते.

Image credits: Sociall media

Hair Straightener : रोज हेअर स्ट्रेटनर वापरताय? मग केसांचं नुकसान ठरलेलं आहे

Gold Mangalsutra : फक्त 5 ग्रॅममध्ये बनवा लेटेस्ट मंगळसूत्र डिझाइन्स

Collagen : शरीरात नैसर्गिकरित्या कोलॅजन वाढवणारे ६ पदार्थ, त्वचा राहील तरुण आणि चमकदार

पाली-झुरळे एकारात्रीत घरातून जातील पळून, करा हा सोपा उपाय