Marathi

स्ट्रेट केसांची आवड आहे?

अभिनेत्री किंवा मॉडेल्ससारखे स्ट्रेट केस सगळ्यांनाच आवडतात. यासाठी अनेकजण रोज हेअर स्ट्रेटनर किंवा ड्रायर वापरतात. पण हे केसांच्या आरोग्यासाठी अजिबात चांगलं नाही.

Marathi

केसांमधला ओलावा नाहीसा होतो

रोज केसांवर उष्णता (Heat) वापरल्यामुळे केसांमधला नैसर्गिक ओलावा कमी होतो. यामुळे केस खूप कोरडे (Dry Hair) होतात आणि त्यांचा मऊपणा नाहीसा होतो.

Image credits: pinterest
Marathi

केसांची मुळं कमकुवत होतात

सतत हीटिंग टूल्स वापरल्यामुळे केसांची मुळं कमकुवत होतात. यामुळे केस गळण्याची (Hair Fall) समस्या गंभीर होऊ शकते.

Image credits: pinterest
Marathi

दुभंगलेल्या केसांची समस्या (Split Ends)

जास्त उष्णतेमुळे केसांची टोकं दुभंगू लागतात. यामुळे केसांची वाढ थांबते आणि ते निर्जीव व विस्कटलेले दिसतात.

Image credits: Pexels
Marathi

टाळूवर खाज आणि जळजळ (Scalp Irritation)

स्ट्रेटनर वापरताना टाळू गरम होते. यामुळे डोक्यातील कोरडेपणा वाढतो आणि खाज व कोंडा होऊ शकतो. कधीकधी हा त्रास इतका वाढतो की डॉक्टरकडे जाण्याची वेळ येते.

Image credits: Pexels
Marathi

केसांचा रंग फिका पडतो

जर तुम्ही केसांना कलर (Hair Color) केला असेल, तर स्ट्रेटनर वापरल्यामुळे तो रंग लवकर फिका पडतो. इतकंच नाही, तर यामुळे केसांच्या नैसर्गिक रंगालाही नुकसान पोहोचतं.

Image credits: Pexels
Marathi

मग उपाय काय?

जर स्ट्रेटनर वापरणं गरजेचंच असेल, तर चांगल्या क्वालिटीचं 'हीट प्रोटेक्टंट' (Heat Protectant) सीरम किंवा स्प्रे वापरा. केसांना नियमित तेल लावून त्यांचं पोषण करा.

Image credits: Pexels

Gold Mangalsutra : फक्त 5 ग्रॅममध्ये बनवा लेटेस्ट मंगळसूत्र डिझाइन्स

Collagen : शरीरात नैसर्गिकरित्या कोलॅजन वाढवणारे ६ पदार्थ, त्वचा राहील तरुण आणि चमकदार

पाली-झुरळे एकारात्रीत घरातून जातील पळून, करा हा सोपा उपाय

खुलेल चेहऱ्याचे सौंदर्य; ट्राय करा हे 6 युनिक डिझाइन्सचे कानातले