बनारसी साडीचा इतिहासह जवळजवळ 2 हजार वर्षांपूर्वीचा आहे. उत्तर प्रदेशातील बनारस, जौनपुर, आजमगढ, चांदौलीत बनारसी साड्या तयार केल्या जातात.
बनारसी साडी खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात हे जाणून घेणार आहोत. जेणेकरुन प्युअर बनारसी सिल्क साडी खरेदी करताना फसवणूकीपासून दूर राहता येईल.
बनारसी साडी ओखळण्यासाठी तिला स्पर्श करुन पाहा. स्पर्श केल्यानंतर बोटांना साडी थोडी गरम लागते. याशिवाय सुर्यप्रकाशानुसार साडीचा रंग बदलला जातो.
प्युअर बनारसी साडी खरेदी करताना पदराकडे आवश्यक लक्ष द्या. या साडीचा पदर नेहमीच 6 ते 8 इंचाचा असतो. याशिवाय पदरावर बारीक सिल्कच्या धाग्यांनी काम केलेले असते.
बनारसी साड्यांवर एक खास प्रकारचे नक्षीकाम असते. त्याला जरोक्का पॅटर्न म्हणतात. यावर बुट्टीकामासह अन्य डिझाइन पहायला मिळते.
प्युअर बनारसी साडी ओखळण्यासाठी अंगठीचा वापर करू शकता. अंगठीच्या आरपार साडी सहजतेने गेल्यास ती प्युअर असल्याचे मानले जाते.
डिझाइन, पॅटर्न आणि कापड ओखळण्याव्यतिरक्त बनारसी साडी खरेदी करताना जीआय टॅगही तपासून पाहा. क्यू आर कोडच्या मदतीने साडीबद्दलची संपूर्ण माहिती मिळवू शकता.