गरुडपुराणानुसार माणसाचा मृत्यू व्हायचा असेल तर इच्छा असूनही तो काही करू शकत नाही. मृत्यूच्या वेळी यमदूत येतात आणि माणसाचा आत्मा घेऊन जातात.
गरुडपुराणात मृत्यूबाबत अनेक रहस्य सांगण्यात आले आहेत. यामध्ये हे पण संगणयत आले आहे की शरीरातून आत्मा कधी निघते आणि ती किती दिवसात यमलोकात जाऊन पोहचते, तेच जाणून घेऊयात.
यमदूत हे आत्म्याला घेऊन यमलोकात जातात. यावेळी रस्त्यात यम आत्म्याला भीती दाखवतो, त्यानंतर आत्मा पृथ्वीवर येऊन त्याच्या मृत शरीराला पाहण्याचं काम करतो.
आत्मा पृथ्वीवर आल्यानंतर परत एकदा शरीरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करते पण यमदूताने बंधी केल्यामुळे त्याला प्रवेश करता येत नाही. यावेळी नातेवाईकांना दुःखी पाहून त्याला दुःख होत.
शरीराला जाळल्यानंतर माणसाचे शरीर हे अंगठ्यासारखं होत. यमलोकात शुभ अशुभ भोग आत्म्याला भोगावे लागतात. ४७ दिवसानंतर आत्मा यमलोकात जाऊन पोहचते.
यमलोकात आत्मा हा भूक आणि तहानेमुळे व्याकुळ होतो. त्याला त्याठिकाणी या २ गोष्टींच्या अडचणींचा सामना करावा लागतो.
रस्त्यामध्ये आत्म्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. येथे यमराज हे चांगले, वाईट काम पाहून त्याला स्वर्गात पाठवायचं की नरकात याचा निर्णय देतात.