केसांमध्ये कोंडा होणे सामान्य बाब आहे. या समस्येमुळे कोंड्यामुळे केसांसोबत चेहर्यावर, पाठीवर, खांद्यावरही बर्याच समस्या वाढतात. यावर घरगुती उपाय काय पुढे जाणून घेऊया.
खोबरेल तेल कोंड्यावर फारच गुणकारी आहे. आठवड्यातून दोन ते तीन वेळा खोबरेल तेलाने मसाज करा. दुसर्या दिवशी शँपूने केस धुवा.
दोन चमचे लिंबाच्या रसाने तुमच्या केसांना मसाज करा आणि पाण्याने केस धुवून टाका. त्यानंतर शँपू लावा. मग कपभर पाण्यात लिंबाचा रस घालून त्या पाण्यानं पुन्हा केस धुवा.
लसूणमध्ये जंतूसंसर्ग बरा करण्याची क्षमता असते. लसणामुळे तुमच्या स्कॅल्पवरचा फंगस नष्ट होतो. म्हणून केस धुण्याआधी लसूण पेस्ट आणि मध यांचं मिश्रण केसांना लावा.
केसांतील कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी कडुलिंबाची पानेही खूप चांगली काम करतात. यासाठी कडूलिंबाची पाने चांगल्या प्रकारे उकळवून घ्या आणि त्याचे पाणी केसांच्या मुळांवर लावा.
दही केसांना पोषण देते आणि दह्यामुळे केसांतील कोंडाच्या समस्येपासून मुक्तता मिळते. यासाठी आंबट दह्यामध्ये एक चमचा मिरपूड पावडर मिसळून हे मिश्रण केसांवर सुमारे एक तास लावून धुवा.
सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.