प्रत्येक वर्षी कार्तिक महिन्यातील अमावस्येला दिवाळी साजरी केली जाते. यंदा दिवाळी 31 ऑक्टोंबर की 1 नोव्हेंबरला असणार याबद्दल बहुतांशजणांचे कंफ्यूजन झाले आहे.
काही पंचांगामध्ये, दिवाळी 31 ऑक्टोंबरला तर काहीमध्ये 1 नोव्हेंबरला साजरी केली जाणार असल्याचे सांगितले आहे.
दिवाळीच्या तारखेवर तोडगा काढण्यासाठी 150 हून अधिक ज्योतिष एकत्रित आले. यावेळी दिवाळीची योग्य तारीख ठरवण्यात आली.
बहुतांश ज्योतिषांनी म्हटले की, 31 ऑक्टोंबर आणि 1 नोव्हेंबरला प्रदोष काळ असणार आहे. अशा स्थितीत शास्रानुसार, दुसऱ्या दिवशीची तिथी घ्यावी. यामुळे दिवाळी 1 नोव्हेंबरला असणार आहे.
अमावस्या तिथीची देवता पितृक आहेत. यामुळे 1 नोव्हेंबरला सकाळी अमावस्येच्या आधी पितरांची पूजा करुन संध्याकाळी लक्ष्मी पूजन करावे.
यंदा धनतेरस दोन दिवस असणार आहे. यावेळी 29 ऑक्टोंबरला धनतेरस साजरी केली जाणार आहे. याच्या दुसऱ्या दिवशी 30 ऑक्टोंबरला भगवान धन्वंतरीची पूजा केली जाणार आहे.
29 ऑक्टोंबर- धनतेरस
30 ऑक्टोंबर- धन्वंतरी जयंती
31 ऑक्टोंबर- नरक चतुर्दशी
1 नोव्हेंबर- दिवाळी, लक्ष्मीपूजन
2 नोव्हेंबर- बलिप्रतिपदा, दिवाळी पाडवा
3 नोव्हेंबर- भाऊबीज