तुमची त्वचा तेलकट असेल, तर फाउंडेशन वितळण्यापासून वाचवण्यासाठी या सोप्या हॅक्स नक्की ट्राय करा. यामुळे तुमचा मेकअप दिवसभर फ्रेश राहील.
तेलकट त्वचा असलेल्या महिलांची सर्वात मोठी समस्या म्हणजे मेकअप केल्यानंतर काही तासांतच फाउंडेशन वितळू लागतं. चेहरा तेलकट दिसतो आणि मेकअप पॅची वाटतो.
तुमची त्वचा तेलकट होत असेल, तर महागड्या फाउंडेशनवर अवलंबून राहण्याऐवजी योग्य मेकअप टेक्निक वापरणं महत्त्वाचं आहे. तुमचा मेकअप फ्रेश ठेवणाऱ्या सोप्या हॅक्स जाणून घ्या.
फाउंडेशन लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवा आणि 1-2 मिनिटं बर्फाच्या तुकड्याने हलक्या हाताने मसाज करा. यामुळे त्वचेची छिद्रं (pores) घट्ट होतात आणि अतिरिक्त तेल नियंत्रणात येतं.
आता, मॅटिफायिंग प्रायमर लावा. हे तुमची त्वचा आणि फाउंडेशनमध्ये एक स्मूथ लेअर तयार करतं. यामुळे मेकअप जास्त काळ टिकतो आणि वारंवार टच-अप करण्याची गरज भासत नाही.
ही हॅक प्रोफेशनल मेकअप आर्टिस्टमध्ये खूप लोकप्रिय आहे. प्रायमर लावल्यानंतर, चेहऱ्यावर थोडीशी ट्रान्सलुसंट पावडर लावा. त्यानंतर तुमचं फाउंडेशन अप्लाय करा.
हे टेक्निक अतिरिक्त तेल शोषून घेण्यास मदत करतं आणि फाउंडेशन त्वचेवर चांगलं सेट करतं. यामुळे तुमचा चेहरा जास्त काळ मॅट आणि फ्रेश दिसतो.
फाउंडेशन, कन्सीलर आणि कॉम्पॅक्ट लावल्यानंतर, चांगल्या क्वालिटीचा सेटिंग स्प्रे वापरा. तो तुमचा मेकअप जागेवर लॉक करतो आणि घाम व तेलामुळे मेकअप खराब होण्यापासून वाचवतो.
तुम्हाला दिवसभर बाहेर राहायचं असेल किंवा पार्टी, लग्न, ऑफिस इव्हेंटला जायचं असेल, तर ही स्टेप अजिबात वगळू नका. यामुळे तुमचा मेकअप तासन्तास टिकून राहतो.
तेलकट त्वचा असलेल्यांनी हेवी, क्रीमी फाउंडेशनऐवजी ऑइल-फ्री आणि लाँग-वेअर फाउंडेशन निवडावं. चेहरा वारंवार धुणे टाळा, कारण त्यामुळे त्वचेत जास्त तेल तयार होऊ शकतं.