घरात कचराडबा कुठे ठेवावा? वाचा वास्तूशास्रात काय सांगितलेय
Lifestyle Aug 01 2026
Author: Chanda Mandavkar Image Credits:Getty
Marathi
तुमच्या कचरापेटीसाठी खास वास्तू टिप्स
वास्तुशास्त्रामध्ये कचरापेटीसाठीही काही नियम सांगितले आहेत. घरात सकारात्मक ऊर्जा आणि संतुलन टिकवण्यासाठी कचरापेटीची योग्य दिशा आणि रंगाचे नियम पाळणं महत्त्वाचं आहे.
Image credits: Getty
Marathi
कचरापेटीसाठी योग्य दिशा कोणती?
वास्तुशास्त्रानुसार, कचरापेटी नेहमी दक्षिण किंवा नैऋत्य दिशेला ठेवावी. जर हे शक्य नसेल, तर वायव्य (North-West) दिशेला ठेवणंही योग्य मानलं जातं.
Image credits: Getty
Marathi
कोणत्या दिशेला कचरापेटी ठेवू नये?
वास्तुशास्त्रानुसार, कचरापेटी कधीही ईशान्य (North-East) दिशेला ठेवू नये. यामुळे घरात तणाव वाढू शकतो आणि कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होऊ शकतो.
Image credits: Getty
Marathi
स्वयंपाकघरात कचरापेटी ठेवता येते का?
अनेक जण स्वयंपाकघरातच कचरापेटी ठेवतात, पण हे चुकीचं आहे. स्वयंपाकघर हे देवी अन्नपूर्णेचं स्थान मानलं जातं आणि तिथे कचरापेटी ठेवल्यास वास्तुदोष निर्माण होतो.
Image credits: Getty
Marathi
मुख्य दरवाजाजवळ कचरापेटी ठेवली तर?
घराच्या मुख्य दरवाजाजवळ किंवा देवघराजवळही कचरापेटी कधीही ठेवू नये. असं केल्यास वास्तुदोष निर्माण होतो, ज्याचा परिणाम घरात राहणाऱ्या प्रत्येकावर होऊ शकतो.
Image credits: Getty
Marathi
कचरापेटीचा रंग कोणता असावा?
घरात शक्यतो निळ्या, पिवळ्या किंवा इतर हलक्या रंगाची कचरापेटी वापरावी. काळ्या किंवा जांभळ्या रंगाची कचरापेटी वापरू नये. तसेच, कचरापेटीवर नेहमी झाकण ठेवावं.