Fennel Seeds: जेवणानंतर एक चमचा बडीशेप खाल्ल्याने काय होतं?
Lifestyle Jul 31 2026
Author: Chanda Mandavkar Image Credits:Social media
Marathi
बडीशेपमधील पोषक तत्वं...
जेवणानंतर बडीशेप खाण्याची सवय अनेकांना असते. ही सवय फक्त अन्न पचवण्यासाठी नाही, तर बडीशेपमध्ये अनेक पोषक तत्वंही असतात. त्यामुळे हे खाण्याचे अनेक फायदे आहेत.
Image credits: Getty
Marathi
मासिक पाळीतील वेदना कमी करते..
महिलांना मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या पोटदुखी आणि इतर वेदनांपासून आराम देण्यासाठी बडीशेप खूप मदत करते.
Image credits: Getty
Marathi
रक्तदाब नियंत्रणात ठेवते
बडीशेप चघळल्याने रक्तदाब (बीपी) नियंत्रणात राहतो. बडीशेपमध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतं. हे हृदयाचे ठोके आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवतं.
Image credits: Getty
Marathi
अपचन, बद्धकोष्ठतेवर रामबाण उपाय
तुम्हाला अपचन, बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या असतील, तर जेवणानंतर थोडी बडीशेप नक्की खा. यामुळे पोटदुखी कमी होण्यासही मदत होते.
Image credits: Getty
Marathi
अस्थमा, कफ कमी होतो
अस्थमा आणि कफामुळे होणाऱ्या खोकल्याचा त्रास असणाऱ्यांनी बडीशेप खाल्ल्यास फायदा होतो. हे अस्थमा, सायनस आणि कफ यांसारख्या समस्यांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते.
Image credits: pexels
Marathi
तोंडाची दुर्गंधी दूर होते
बडीशेप चघळल्याने तोंडाची दुर्गंधी नाहीशी होते. यामुळे लाळेची निर्मिती वाढते आणि हे नैसर्गिक माऊथ फ्रेशनर म्हणून काम करते.
Image credits: Getty
Marathi
आतड्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर
बडीशेपमध्ये अँटिस्पास्मोडिक (antispasmodic) गुणधर्म आहेत. हे पोटदुखी आणि आतड्यांमधील अस्वस्थता कमी करून त्यांचे आरोग्य सुधारतात.