आपण सहसा मीठ ओलसर झाल्यावर ते उन्हात वाळवण्याचा प्रयत्न करतो. किंवा ते फेकून देऊन नवीन मीठ आणतो. पण आता असं अजिबात करू नका.
ओलसर झालेलं मीठ पुन्हा पहिल्यासारखं कोरडं करण्यासाठी तुमच्या स्वयंपाकघरातील 'एक मूठभर तांदूळ' पुरेसा आहे!
तुम्ही पाणी गेलेल्या मिठाच्या डब्यात किंवा बरणीत एक मूठभर कोरडे तांदूळ टाका आणि ते चांगले मिसळा. त्यानंतर झाकण लावून डबा बाजूला ठेवा.
तांदळामध्ये ओलावा वेगाने शोषून घेण्याचा नैसर्गिक गुणधर्म असतो. तांदूळ काही तासांतच मिठातील अतिरिक्त पाणी पूर्णपणे शोषून घेतात.
थोड्या वेळानंतर मीठ पूर्णपणे सुकतं आणि पहिल्यासारखं कोरडं होतं. तुम्ही हवं असल्यास तांदूळ चाळणीने वेगळे करू शकता किंवा तसेच ठेवू शकता.
मीठ ओलसर होऊन त्याचे खडे होऊ नयेत म्हणून, तुम्ही मिठाच्या डब्यात नेहमी १० ते १५ तांदळाचे दाणे टाकून ठेवणं फायद्याचं ठरतं.
Microwave Safety : या ७ गोष्टी मायक्रोवेव्हमध्ये चुकूनही गरम करू नका
Green Beads Long Haram : साडीवर तुमचं सौंदर्य दुप्पट करणारे पाचूचे हार, पाहा डिझाईन्स
Ear Cuff Jhumka : साडी आणि लेहेंग्यावर भारी दिसतील हे इअर कफ झुमके
Gold Rings : मुलींच्या मनाला भुरळ घालणाऱ्या सोन्याच्या अंगठ्या, डिझाईन्स पाहाच