कँडी टॉपच्या आघाडीच्या उत्पादकांपैकी एक असलेल्या Candytoy कॉर्पोरेटने 1,400 स्टोअरमध्ये मिठाईची खेळणी पुरवण्यासाठी रिलायन्स रिटेलसोबत भागीदारी केली आहे.
सध्या 15 हून अधिक दुकानांच्या खरेदीच्या ऑर्डर आहेत. दिवाळीच्या अखेरीस २०० दुकाने सुरू होतील आणि चालू आर्थिक वर्षाच्या अखेरीस १४०० दुकाने सुरू होतील.
रिलायन्स रिटेलच्या 200 दुकानांमधून दरमहा 2 कोटी रुपये मिळणार असून या आर्थिक वर्षाच्या अखेरीस ते दरमहा 4-4.5 कोटी रुपयांपर्यंत दिले जातील असं सांगण्यात आलं आहे.
कंपनीची बाजारपेठ ही १००० कोटी रुपयांची असल्याची माहिती देण्यात आली आहे. जागतिक स्तरावर 40 देशांमध्ये इतर किरकोळ विक्रेत्यांना पुरवठा करत आहे.
पुढील २ ते ३ वर्षात कंपनी IPO आणणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षात २६० ते २८० कोटी रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.