अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी देशात बदलणार हे नियम
पेन्शन नियामक PFRDAने जानेवारी महिन्यातच स्पष्ट केले होते की, घर खरेदी, मुलांचे शिक्षण अशा काही गोष्टींसाठी बँक खात्यात जमा केलेल्या रक्कमेच्या 25 टक्के रक्कम काढता येणार आहे.
NHAI कडून 31 जानेवारीनंतर KYC प्रक्रिया पूर्ण न केलेले फास्टॅग वापरता येणार नसल्याची घोषणा केली होती. यामुळे 1 फेब्रुवारीपासून केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
अर्थसंकल्पापूर्वी 1 फेब्रुवारीपासून एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात बदल होऊ शकतो. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल कंपन्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात बदल करतात.
RBI कडून आर्थिक वर्ष 2023-24 च्या सॉवेरन गोल्ड बाँडचा शेवटचा हप्ता जारी केला जाणार आहे. SGB 2023-24 सीरिज 4 येत्या 12 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे.
भारतीय स्टेट बँक आपल्या ग्राहकांना गृह कर्जावर सूट देते. यामध्ये 65 BPS पर्यंतच्या व्याजावर गृह कर्ज दिले जाते. प्रोसेसिंग फी आणि गृह कर्जावरील सूटसंदर्भात आजचा शेवटचा दिवस आहे.
पंजाब अॅण्ड सिंध बँकेची स्पेशल एफडी ‘धन लक्ष्मी 444 दिवस’ ची आजची शेवटची तारीख आहे. या योजनेअंतर्गत नागरिकांना 444 दिवसांसाठी 7.4 टक्के व्याजदर दिला जाणार आहे.
1 फेब्रुवारीपासून युजर्सला केवळ Receiver चा मोबाइल क्रमांक व बँक खात्याचे नाव भरून IMPS च्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करता येणार आहेत.