अयोध्येतील महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पाहा PHOTOS
राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी प्रवासांच्या स्वागतासाठी अयोध्येतील महर्षी वाल्किमी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.
विमानतळ हे रामायणाच्या थीमवर साकारण्यात आले आहे. विमानतळावर श्रीराम, माता सीता, लक्ष्मण, हनुमान आणि रामायणातील अन्य पात्रे तुम्हाला पाहायला मिळतील.
अयोध्येतील अत्याधुनिक सोयी-सुविधा असलेल्या विमानतळासाठीचा पहिला टप्पा 1450 कोटी रूपये खर्च करून तयार करण्यात आला आहे.
आंतरराष्ट्रीय विमानतळावर अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध असणार आहेत. याशिवाय राममंदिराच्या वास्तुसंस्कृतीसह विमानतळाला पारंपारिक रूप देण्यात आले आहे.
अयोध्येतील महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळावर रामललांच्या आयुष्यावर स्थानिक कला, चित्र आणि भित्तीचित्रांची सजावट करण्यात आली आहे.
अयोध्येतील विमानतळ राम मंदिरापासून 15 किलोमीटर दूर अंतरावर उभारण्यात आले आहे. विमानतळावरुन मंदिरापर्यंत जाण्यासाठी काही सुविधा उपलब्ध असणार आहेत.
विमानतळावर आलेल्या प्रवाशांना उत्तम सुविधा प्रदान केल्या जाणार आहेत. यामध्ये एअरबस A320 सारखे एअरक्राफ्टच्या लँडिंगसाठी सुविधा उपलब्ध असणार आहे.
अयोध्येतील महर्षी वाल्किमी आंतरराष्ट्रीय विमानतळावर वर्षाला 10 लाखांच्या आसपास भाविक आणि प्रवासी येण्याची शक्यता आहे. त्यानुसारच विमानतळाची उभारणी करण्यात आली आहे.