राम मंदिरात सोन्या-चांदीच्या पादुका स्थापन करण्यात येणार
22 जानेवारी 2024 रोजी रामललांच्या प्राणप्रतिष्ठेचा भव्य सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह व्हीव्हीआयपी देखील उपस्थितीत राहणार आहेत.
अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यानंतर चरण पादुका स्थापन केल्या जाणार आहेत. या पादुका 19 जानेवारीला (2024) अयोध्येत आणल्या जाणार आहेत.
अयोध्येतील राम मंदिरात स्थापन करण्यात येणाऱ्या पादुका देशभरात फिरवल्या जात आहेत. जेणेकरून भाविकांना या पादुकांचे दर्शन करता येईल.
रामललांच्या पादुका एक किलोग्रॅम सोनं आणि सात किलोग्रॅम चांदीपासून तयार करण्यात आलेल्या आहेत.
रामललांच्या पादुका हैदराबादमधील श्रीचल्ला श्रीनिवास शास्री यांनी तयार केल्या आहेत. श्रीचल्ला यांनी पादुका हातात घेऊन 41 दिवस अयोध्येत तयार होणाऱ्या मंदिराभोवती परिक्रमा केली होती.