रजनीकांत ते सुरिया आता पर्यंत ‘या’ सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क
India Apr 19 2024
Author: Ankita Kothare Image Credits:social media
Marathi
प्रसिद्ध अभिनेता रजनीकांत
साऊथचे सुपरस्टार चित्रपट अभिनेते रजनीकांत यांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. तो मीडियासमोरही हजर झाला आणि त्याचे फोटो क्लिक केले.
Image credits: social media
Marathi
राजकीय नेते आणि अभिनेता कमल हसन
प्रसिद्ध अभिनेते आणि मक्कल निधि मैयम पक्षाचे अध्यक्ष कमल हसन यांनीही मतदानाचा हक्क बजावला आहे.त्यांचा पक्ष लोकसभा निवडणूक लढवत नाहीये पक्षाने DMK ला पाठिंबा दिला आहे.
Image credits: social media
Marathi
विजय सेतुपती
अभिनेता विजय सेतुपतीनेही चेन्नईमधील किलपौक हायस्कूलमध्ये मतदानाचा हक्क बजावला.
Image credits: social media
Marathi
अभिनेता धनुष
रजनीकांत यांचा जावई आणि साऊथ सुपरस्टार धनुषने मतदान केलंय. टीटीके रोडवरील सेंट फ्रान्सिस झेव्हियर्स स्कूलमध्ये त्याचं मतदान केंद्र होतं. मतदानानंतर त्याने कॅमेरासमोर पोझ दिले.
Image credits: social media
Marathi
अभिनेता सुरिया शिवकुमार आणि अभिनेता कार्थी
अभिनेता सुरिया शिवकुमार आणि अभिनेता कार्थी यांनी देखील मतदानाचा हक्क बजावत नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
Image credits: twiiter
Marathi
अभिनेता अजिथ कुमार
प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता अजिथ कुमारनेही मतदान केले आहे. तसेच त्यांनी नागरिकांना मतदान करत लोकशाहीला बळकट करण्याचे आवाहन केले.