पल्लवी डेम्पो या लोकसभा निवडणुकीत गोव्यातून भाजपकडून रिंगणात उतरलेल्या पहिल्या महिला आहेत.
गोव्यातील नव्हे तर भारतातील प्रसिद्ध उद्योगपती श्रीनिवास डेम्पो यांच्या पल्लवी पत्नी आहेत. डेम्पो समूह रिअल इस्टेट, जहाज निर्मित सह विविध व्यवसायात सक्रिय आहेत.
राजकारणासोबतच पल्लवी डेम्पो या उद्योग क्षेत्रातही तेव्हढ्याच सक्रिय आहेत. ४९ वर्षीय पल्लवी यांचे पुण्यातील एमआयटी येथून मॅनेजमेंटमध्ये शिक्षण झाले आहे.
पल्लवी आणि श्रीनिवास यांच्याकडे सुमारे 1,400 कोटी रुपयांची संपत्ती आहे. पल्लवीकडे 255.4 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. त्यांच्या पतीची 994.8 कोटी रुपयांची मालमत्ता आहे.
पल्लवी यांच्याकडे 28.2 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्याचबरोबर तिच्या पतीची 83.2 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.
पल्लवी आणि तिच्या पतीच्या नावावर सवाना, दुबई येथे अडीच कोटी रुपयांचा फ्लॅट आणि लंडनमध्ये 10 कोटी रुपयांचा फ्लॅट आहे. पल्लवीकडे 5.7 कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने आहेत.
पल्लवीने 2022-23 या आर्थिक वर्षासाठी 10 कोटी रुपयांचे आयकर रिटर्न भरले होते. त्यांचे पती श्रीनिवास यांनी 11 कोटी रुपयांचे रिटर्न भरले होते.