PM मोदींनी X वर एक खास पोस्ट शेअर केली. त्यांच्या निवासस्थानी एका गायीचे वासरू आले. हे वासरू दीपज्योती म्हणून ओळखलं जाईल, कारण त्याच्या कपाळावर प्रकाशाची खूण आहे.
आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात आढळणारी पुंगनूर गाय अत्यंत लहान आणि सुंदर आहे. या गायींचा उंची साधारणतः अडीच फूट आहे आणि वजन 105 ते 200 किलोच्या दरम्यान असते.
पुंगनूर गायीचे दूध 3 लिटरपर्यंत असते. त्यात 8% फॅट असते, जी इतर गायींच्या दुधाच्या तुलनेत खूप जास्त आहे. त्यांच्या मूत्रात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत.
शेतकऱ्यांच्या संकरित प्रजननामुळे पुंगनूर जातीची गाय लोप होत आहे. आंतरराष्ट्रीय अन्न आणि कृषी संस्था, प्राणी अनुवंशिक संसाधनांनी या जातीला लुप्तप्राय पुंगनूर जातीमध्ये समाविष्ट केलं
एनटीआर युनिव्हर्सिटी ऑफ व्हेटर्नरी सायन्सेसचे शास्त्रज्ञ पुंगनूर गायींचे संरक्षण करतात.आंध्र प्रदेशात पुंगनूर गायींची संख्या 2772 होती. संशोधन केंद्रांनी संवर्धनासाठी प्रयत्न सुरू.
दक्षिण भारतात पुंगनूर गायी पाळणे स्टेटस सिम्बॉल झाले. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन. किरणकुमार रेड्डी, तिरुमला तिरुपती देवस्थानमचे चेअरमन एन हरिकृष्ण यांनी ही गाय पाळली.
पुंगनूर गाय सौभाग्याचे प्रतीक आहे. तिचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्वामुळे तिची किंमत वाढतेय. पंतप्रधान मोदींच्या दीपज्योतीच्या आगमनाने या गाईला अधिक महत्व प्राप्त झाले आहे.