१ जून २०२४ पासून सिलिंडरच्या किंमती कमी झाल्या आहेत. कंपन्यांनी गॅसच्या किंमती कमी केल्यामुळे हे शक्य झाले आहे. १९ किलोग्रॅम वजनाचे सिलिंडरच्या किंमत कमी झाल्या आहेत.
कंपन्यांनी १९ किलोग्रॅम वजनाच्या सिलिंडरच्या किंमती कमी केल्या आहेत. या सिलिंडरच्या ७२ रुपयांनी किंमत कमी झाल्या आहेत.
मुंबईमध्ये १९ किलोग्रॅम वजनाच्या कमर्शियल सिलिंडरची किंमत १६२९ रुपये झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना याचा फायदा मिळणार आहे.
सलग तिसऱ्या महिन्यात सिलिंडरच्या किंमती कमी झाल्या आहेत. एप्रिल, मेनंतर जूनमध्ये ही किंमत कमी झाली आहे.
कमर्शियल गॅसचा वापर हा हॉटेल आणि रेस्टोरंटमध्ये खासकरून केला जातो. गॅस सिलिंडरची किंमत कमी झाल्यामुळे हॉटेलमधील जेवण स्वस्त होऊ शकते.