९२ वर्षीय माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी निधन झाले. २८ डिसेंबरला त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील. केंद्र सरकारने 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.
त्यांनी १० वी नंतर हिंदू कॉलेज हे त्यांचे प्री-कॉलेज म्हणून निवडले. सप्टेंबर १९४८ मध्ये त्यात प्रवेश घेतला व प्रथम क्रमांक मिळविला. ज्यासाठी त्यांना रोल कॉल ऑफ ऑनरचा सन्मान मिळाला.
सिंग यांनी २०१८ मध्ये हिंदू कॉलेजमधील माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात सांगितले होते की, शिक्षकांच्या सल्ल्याने त्यांनी अर्थशास्त्रात बीए ऑनर्स निवडले. १९५२ मध्ये पुन्हा टॉपर बनले
त्यांची कहाणी सांगताना ते म्हणाले होते की, महाविद्यालयाचे माजी प्राचार्य संतराम, प्रा. मस्तराम, प्रा. एसआर कालिया, डॉ. जुगल किशोर त्रिखा व डॉ. सुदर्शन कपूर हे त्यांचे आदर्श होते.
रेकॉर्डनुसार सिंग यांचा रोल नंबर १९ होता. ते अभ्यासात खूप हुशार होते. कॉलेज त्यांच्याकडून फक्त निम्मी फी घेत असे. त्यांचे पदवीमध्ये अर्थशास्त्र, राज्यशास्त्र व पंजाबी विषय होते.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मित्रांचे म्हणणे आहे की, ते इतक्या कमी शब्दांत आणि शांततेने आपले मत मांडायचे की सगळे प्रभावित व्हायचे. त्यांचा बराचसा वेळ ग्रंथालयात जात असे.
डॉ. मनमोहन सिंग यांचे मित्र सांगतात की, सर्व मित्र जेव्हा एकत्र बसायचे तेव्हा चित्रपट आणि चित्रपट अभिनेत्रींबद्दल चर्चा व्हायची, जे ऐकून मनमोहन सिंग लाजायचे.