२०२४ मध्ये भारताने अनेक ऐतिहासिक कामगिरी आपल्या नावावर केली आहे. UPI ने १६.५ अब्ज व्यवहार झाले आहेत. तसेच भारताने प्रथमच लांब पल्ल्याच्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची चाचणी केली.
२०२४ मध्ये भारतात UPI च्या मदतीने विक्रमी १६.५ अब्ज (१६५० कोटी) व्यवहार झाले आहेत
भारताची अक्षय ऊर्जा क्षमता २०० गिगावॅटवर पोहोचली आहे.
भारताने आपल्या पहिल्या लांब पल्ल्याच्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली.
१० वर्षात वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या ३८७ वरून ७६६ वर पोहोचली.
२०२४ मध्ये जगभरात दिलेल्या निम्म्या लसी आणि वापरल्या जाणाऱ्या गोळ्यांपैकी एक तृतीयांश गोळ्या भारतात तयार केल्या गेल्या.
आयुष्मान भारत PM-JAY ७० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ६० दशलक्ष ज्येष्ठ नागरिकांना लाभ देण्यासाठी विस्तारित केले आहे.
भारत जगातील तिसरा सर्वात मोठा देशांतर्गत विमान वाहतूक करणारा देश बनला आहे.
लहान व्यवसायांच्या वाढीसाठी, मुद्रा कर्ज मर्यादा १० लाख रुपयांवरून २० लाख रुपये करण्यात आली.
महाराष्ट्रातील वाढवन येथे भारतातील सर्वात मोठे कंटेनर बंदर विकसित केले जात आहे. यासाठी ७६ हजार कोटी रुपये खर्च येणार आहे.