एक लेखिका तर दुसरी इतिहासकार... काय करतात मनमोहन सिंहच्या मुली?
India Dec 27 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:Social Media
Marathi
माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचे निधन
भारताचे माजी पंतप्रधान आणि अर्थशास्री डॉ. मनमोहन सिंह यांचे गुरुवारी (26 डिसेंबर) निधन झाले.
Image credits: X- Tejasvi Surya
Marathi
देशाच्या विकासासाठी महत्वाची भूमिका
मनमोहन सिंह यांच्या कार्यकाळात (2004-2014) पर्यंत भारताच्या पंतप्रधानांच्या रुपात काम केले. यादरम्यान, देशाच्या विकासासाठी काही महत्वाच्या भूमिका बजावल्या.
Image credits: X- B L Santhosh
Marathi
मनमोहन सिंह यांचा परिवार
मनमोहन सिंह यांचा परिवार विभाजनानंतर भारतातील पंजाबमधील अमृतसह येथे आला.1958 मध्ये गुरुशरण कौर यांच्यासोबत मनमोहन सिंह यांनी विवाह केला. गुरुशरण इतिहासाच्या शिक्षिका व लेखिका आहेत.
Image credits: X- Sameer Hoda
Marathi
मनमोहन सिंह यांच्या मुली
मनमोहन सिंह यांना तीन मुली- अमृत सिंह, दमन सिंह आणि उपिंदर सिंह अशी त्यांची नावे आहेत. यामधील मोठी मुलगी उपविंदर सिंह एक प्रसिद्ध इतिहासकार आहे.
Image credits: X-Rahul Gandhi
Marathi
मोठी मुलगी इतिहासकार
उपविंदर सिंह यांनी कॅनडामधील मॅकगिल युनिव्हर्सिटीमधून पीएचडी केली आहे. उपविंदर यांच्याकडे दिल्ली युनिव्हर्सिटीच्या इतिहासात मास्टर ऑफ आर्ट्स व इतिहासात एम. फिल ची डिग्री आहे.
Image credits: X-Rahul Gandhi
Marathi
दुसरी मुलगी दमन सिंह
मनमोहन सिंह यांची दुसरी मुलगी दमन सिंह आहे. त्या एक लेखिका आहेत. दमन यांचा विवाह 1983 बॅचचे आयपीएस अधिकारी अशोक पटनायक यांच्यासोबत झालेय.
Image credits: insta- ideai.in
Marathi
तिसरी मुलगी अमृत सिंह
मनमोहन सिंह यांची तिसरी मुलगी अमृत सिंह अमेरिकन सिव्हिल लिबर्टीज युनियनमध्ये एक स्टाफ वकील आहे.