राजस्थानच्या एका साधारण कुटुंबात जन्म घेतलेल्या जया किशोरी यांना संपूर्ण देश ओळखतो. त्या जितकं चांगलं भाषण देतात, तितक्याच चांगल्या त्या दिसतात.
जया किशोरी सांगतात की, जेव्हा आपण आतून सुंदर आणि खुश दिसता तसेच बाहेर दिसायला लागते. आपल्या आतमध्ये जे असते त्याचेच प्रतिबिंब बाहेर दिसायला सुरुवात होते.
जया किशोरी यांनी सांगितले की, त्या चेहऱ्यावर कोणतीही क्रीम लावत नाहीत. पण अशा दोन गोष्टी आवर्जून लावतात, त्या संपूर्ण कुटुंब चेहऱ्यावर लावते.
जया किशोरी यांनी सांगितले की, सुंदर दिसण्याचा त्यांच्याकडे कोणताही फॉर्म्युला नाही. रोज सकाळी दह्यात बेसन मिसळून त्या चेहऱ्यावर लावतात. याशिवाय एका मॉइस्चराइजरचा त्या वापर करतात.
झोपायच्या आधी जया किशोरी या चांगली पुस्तके वाचतात, भजन ऐकतात आणि आनंदी राहतात. याचा परिणाम चेहऱ्यावर दिसत असल्याचं त्यांनी यावेळी म्हटले आहे.
आपल्या चेहऱ्यावर आनंदी दिसण्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे आपण डाएट करायला हवं आणि त्यानंतर मनातून खुश राहायला हवे. हे दोन्ही केल्यास आपण आनंदी राहू शकता.