अरविंद केजरीवाल यांचे पीए बिभव कुमार यांच्या अडचणी वाढणार असून पोलीस ते सहकार्य करत नसल्याचे सांगत आहेत.
बिभव कुमार यांनी फोन का फॉरमॅट केला हे पोलिसांना अजूनही कळलेले नाही. त्यामुळे पोलिसांपुढील अडचणी वाढल्या असून तपास कसा करावा त्यावर मार्ग निघत नाही.
बिभव कुमार यांनी मोबाईल हँग होत असल्यामुळे फॉरमॅट केल्याचे कारण दिले आहे. फोन फॉरमॅट केल्यामुळे त्यामधील सर्व डेटा निघून गेला आहे.
दिल्ली पोलिसांच्या म्हणण्यानुसार फोन फॉरमॅट करण्याच्या आधी त्यामधील डेटा हा सेव्ह केला जातो. पण या फोनमधील डेटा कुठे सेव्ह केला आहे याचा मागोवा घेतला जात आहे.
दिल्ली पोलिसांनी बिभव कुमार हे फक्त हो आणि नाहीमध्येच उत्तर देत असल्याची माहिती दिली आहे. आता मोबाईलमधील डेटा रिकव्हर करण्यासाठी तो मुंबईला नेला जाण्याची शक्यता आहे.
बिभव कुमार यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून त्यांच्यावर स्वाती मालिवाल यांना मारहाण केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.