लोकप्रिय अभिनेत्री जया प्रदा यांनी चित्रपट जगतापासून दूर राहून राजकारणात आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आहे.
सैफ अली खानपासून घटस्फोट घेतल्यानंतर सारा अली खानची आई अमृता सिंग चित्रपटांपासून दुरावल्या आहेत.
मीनाक्षी शेषाद्री १९९५ मध्ये अमेरिकेला गेल्या आणि एका इन्व्हेस्टमेंट बँकरशी लग्न करून तिथेच स्थायिक झाल्या.
८० च्या दशकातील सुंदर अभिनेत्री पूनम धिल्लन सध्या चित्रपटांमध्ये आईची भूमिका साकारत असून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
पद्मिनी कोल्हापुरे या अनेक रिॲलिटी शोमध्ये पाहुणी म्हणून दिसल्या आहेत. त्याचबरोबर त्या काही चित्रपटांमध्ये आईच्या भूमिकेत दिसल्या.
मंदाकिनीचे नाव दाऊद इब्राहिमसोबत जोडले गेले. त्यानंतर त्या इंडस्ट्रीपासून दुरावल्या आणि त्यांनी एका तिबेटी डॉक्टरशी लग्न केले.
तब्बूची बहीण फराह नाजने काही चित्रपटांमध्ये काम केले आणि त्यानंतर तिने लग्न केले आणि तिने ग्लॅमर जगताशी संबंध तोडले.
रती अग्निहोत्रीही आता चित्रपटांमध्ये आईच्या भूमिकेत दिसतात.