अल्लू अर्जुनचा सिनेमा ‘पुष्पा- 2’ सिनेमा 5 डिसेंबरला प्रदर्शित झाल्यानंतर सातत्याने बॉक्स ऑफिसवर नवा धमाका करत आहे. सिनेमा बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत आहे.
सॅकनिल्कच्या रिपोर्ट्सनुसार, सिनेमाने पेड रिव्हूच्या माध्यमातून 10.65 कोटी कमावले होते. याशिवाय अन्य भाषांमध्ये सिनेमाने पहिल्याच दिवशी 174.9 कोटींची कमाई केली होती.
सिनेमाने दुसऱ्या दिवशी भारतात 90.10 कोटी रुपयांची कमाई केली होती. यामुळे दोन दिवसात एकूण 265 कोटींची कमाई केली आहे. याशिवाय जगभरात सिनेमाने 400 कोटींचा आकडा पार केलाय.
500 कोटींमध्ये तयार करण्यात आलेल्या पुष्पा-2 सिनेमाने दुसऱ्याच दिवशी 400 कोटींहून अधिक कमाई करत स्वत:मध्येच एक नवा रेकॉर्ड ब्रेक केला आहे.
पुष्पा-2 सिनेमाचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले असून हिंदी, तेलुगु, तमिळ, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित करण्यात आला आहे.
पुष्पा-2 सिनेमाचा पहिला भाग पुष्पा वर्ष 2021 मध्ये रिलीज झाला होता. पुष्पा सिनेमानेही बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली होती.