2024 मधील टॉप 7 सिक्वेल चित्रपट: पुष्पा 2 ने किती कमाई केली?
2024 मध्ये सिक्वेल चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवले. चला जाणुन घेऊया कोणत्या चित्रपटाच्या सिक्वेलने सर्वाधिक कमाई केली.
Entertainment Dec 06 2024
Author: Jagdish Bobade Image Credits:Social Media
Marathi
7. Aranmanai 4 (तमिळ)
2014 मध्ये पहिला भाग, 2016 मध्ये दुसरा आणि 2021 मध्ये तिसरा भाग आल्यानंतर या वर्षी या चित्रपटाचा चौथा भाग आला. या चित्रपटाने जगभरात 98 कोटींची कमाई केली.
Image credits: Social Media
Marathi
6.जट्ट अँड ज्युलिएट 3 (पंजाबी)
या चित्रपटाने जगभरात 102.31 कोटींची कमाई केली. दिलजीत दोसांझ व नीरू बाजवा यांची भूमिका असलेला हा चित्रपट 2012 मध्ये रिलीज झालेल्या 'जट अँड ज्युलिएट'चा तिसरा भाग आहे.
Image credits: Social Media
Marathi
5. बॅड न्यूज (हिंदी)
2019 मध्ये या चित्रपटाचा पहिला भाग 'गुड न्यूज' नावाने आला होता. 'बॅड न्यूज'मध्ये विकी कौशल, तृप्ती डिमरी मुख्य भूमिकेत आहेत. याने जगभरात 115.74 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
Image credits: Social Media
Marathi
4. सिंघम अगेन (हिंदी)
सिंघम (2011) आणि 'सिंघम रिटर्न्स' (2014) नंतर या फ्रँचायझीचा तिसरा चित्रपट या वर्षी आला. अजय देवगण स्टारर या चित्रपटाने जगभरात ३८६.१ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
Image credits: Social Media
Marathi
3. भूल भुलैया 3 (हिंदी)
2007 मध्ये रिलीज झालेल्या 'भूल भुलैया' व 2022 मध्ये आलेल्या 'भूल भुलैया 2' नंतर या वर्षी चित्रपटाचा तिसरा भाग आला. कार्तिक आर्यनच्या या चित्रपटाने जगभरात ४२१.०२ कोटींची कमाई केली.
Image credits: Social Media
Marathi
2. स्त्री 2 : सरकटे का आतंक (हिंदी)
2018 मध्ये रिलीज झालेल्या 'स्त्री'चा हा दुसरा भाग आहे. श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव स्टारर या चित्रपटाने जगभरात 874.58 कोटींची कमाई केली.
Image credits: Social Media
Marathi
1. पुष्पा 2: द रूल (तेलुगु)
अल्लू अर्जुन स्टारर या चित्रपटाने पहिल्याच दिवशी जगभरात 282.91 कोटींची कमाई केली. 5 डिसेंबर रोजी रिलीज झालेला हा चित्रपट 2021 मध्ये रिलीज झालेल्या 'पुष्पा: द राइज'चा दुसरा भाग आहे.