हा असा क्षण आहे जो मी आयुष्यभर जपून ठेवेन, शाहरुख खानची प्रतिक्रिया
Entertainment Aug 02 2025
Author: vivek panmand Image Credits:instagram
Marathi
शाहरुख खानला पुरस्कार जाहीर
शाहरुख खानला जवान चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर करण्यात आला. त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि जास्त कमाई करून देणारा हा चित्रपट आहे.
Image credits: instagram
Marathi
काय प्रतिक्रिया दिली?
हा असा क्षण आहे जो तो आयुष्यभर जपेल. यासोबतच त्याने ज्युरी आणि आयबी मंत्रालयाचेही आभार मानले. त्यानंतर त्यानं एक्स या प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ शेअर केला आहे.
Image credits: instagram
Marathi
शाहरुख खानला फ्रॅक्चर झाल्याचं व्हिडिओत दिसून आलं
व्हिडिओमध्ये शाहरुख खानला फ्रॅक्चर झाल्याचं दिसून आलं. काही दिवसांपूर्वी त्याच्या हाताला दुखापत झाली होती, त्यामुळं डॉक्टरांनी आराम घेण्याचा सल्ला दिला आहे.
Image credits: instagram
Marathi
व्हिडिओमध्ये आभार केले व्यक्त
नमस्कार आणि आदाब. राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल मी कृतज्ञता, अभिमान आणि नम्रतेने भारावून गेलो आहे हे वेगळे सांगायला नको. हा असा क्षण आहे जो मी आयुष्यभर जपून ठेवेन.
Image credits: instagram
Marathi
मंत्रालयाचे आभार केले व्यक्त
ज्युरी, अध्यक्ष आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे खूप खूप आभार. ज्यांना मी या सन्मानासाठी पात्र वाटलो त्या सर्वांचे आभार."
Image credits: instagram
Marathi
राजू सरांचे मानले आभार
तो म्हणाला- "राजू सर, सिड, अॅटली सर आणि त्यांच्या टीमचे आभार. ज्यांनी मला 'जवान'मध्ये संधी दिली आणि माझ्यावर विश्वास ठेवला.
Image credits: instagram
Marathi
दुखापतीबाबत शाहरुख काय म्हणाला?
"मला माझे हात पसरून माझे प्रेम वाटायचे आहे, पण मी थोडा आजारी आहे. काळजी करू नका, फक्त पॉपकॉर्न तयार ठेवा. मी लवकरच थिएटरमध्ये परत येईन."