प्रजासत्ताक दिनानिमित्त मुलांना दाखवा देशभक्ती जागृत करणारे हे सिनेमे
देशाच्या 75व्या प्रजासत्ताक दिनानिमित्तचा सोहळा सर्वत्र आनंदाने पार पडत आहे. या निमित्त मुलांना देशभक्ती जागृत करणारे पुढील काही बॉलिवूडमधील सिनेमे नक्की दाखवा.
हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोण यांचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘फायटर’ सिनेमा मुलांना दाखवू शकता. या सिनेमाची कथा पाकिस्तानवर करण्यात आलेल्या सर्जिकल आणि हवाई हल्ल्यावर आधारित आहे.
शाहरुख खान याच्या ‘जवान’ सिनेमात सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करण्यात आले आहे. तुमच्या मुलांना यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ‘जवान’ सिनेमा दाखवू शकता.
सनी देओलचा ‘बॉर्डर’ सिनेमा पाकिस्तानसोबत वर्ष 1971 मध्ये झालेल्या युद्धावर आधारित आहे. यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुलांना तुम्ही बॉर्डर सिनेमा दाखवू शकता.
‘राझी’ सिनेमातील आलिया भटने एका काश्मिरी मुलीची भुमिका साकारली आहे. सिनेमात आलिया आपला जीव धोक्यात घालून पाकिस्तानातील गुप्त माहिती भारतापर्यंत पोहोचवण्याचे काम करताना दिसतेय.
आमिर खान स्टारर ‘रंग दे बसंती’ सिनेमा मुलांना आवर्जुन दाखवला पाहिले. या सिनेमात प्रत्येक स्तरावर भ्रष्टाचार कशा पद्धतीने चालतो त्याचा खुलासा करण्यात आले आहे.
‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ सिनेमातून दहशतवाद्यांच्या विरोधात भारतीय सैन्याने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकबद्दल दाखवण्यात आले आहे.
भारतीय सैन्यातील सर्वाधिक धाडसी अधिकाऱ्यांच्या रुपात सॅम बहादुर यांचे नाव घेतले जाते. ‘सॅम बहादुर’ सिनेमा नक्कीच मुलांना यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दाखवू शकता.